करिअर संसद: नामनिर्देशन प्रक्रिया


नामनिर्देशन प्रक्रिया:

करिअर संसद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी:

अर्ज सादर करणे:

  1. नामनिर्देशन अर्ज महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्यासाठी उपलब्ध असतील.
  2. उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या नामनिर्देशन अर्जाची प्रिंट काढून महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागात जमा करावे.
  3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवजांचा एक समावेश करावा:
    1. ओळखपत्राची प्रत (महाविद्यालयाने जारी केलेले ID कार्ड किंवा प्रवेश शुल्क भरल्याची पावती)
    2. ७०% हजेरीचे प्रमाणपत्र (आपणास शिकवीत असलेल्या कोणत्याही शिक्षकाचे प्रमाणपत्र)
    3. करिअर कट्टा ओळखपत्र

अर्ज परत घेणे:

  1. अर्ज परत घेण्यासाठी, उमेदवारांनी प्रशासन विभागात लेखी अर्ज सादर करावा.

अर्ज तपासणी:

  1. निवडणूक विभाग उमेदवारी अर्जांची तपासणी करून योग्यतेच्या निकषांची पडताळणी करेल.
  2. अपूर्ण किंवा अयोग्य अर्ज फेटाळण्यात येतील आणि त्याबाबत उमेदवारांना लेखी सूचित केले जाईल.

अंतिम उमेदवार यादी:

  1. निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी महाविद्यालयाच्या नोटिस बोर्डावर आणि अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

प्रचार कालावधी:

  1. निवडणुकीतील सर्व उमेदवारांसाठी एक बैठक आयोजित केली जाईल ज्यामध्ये निवडणूक प्रक्रिया, आचारसंहिता, आणि प्रचार नियम स्पष्ट केले जातील.
  2. प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराने एक स्वत:चा आपले मत, उद्दिष्ट्य, व्हिजन आणि मिशन सांगणारा आवाहन करणारा व्हिडीओ तयार करावा व निवडणूक विभागात सादर करावा. हा व्हिडीओ संबंधित वर्गाच्या ग्रुपवर विद्यार्थ्यांसाठी पाठविण्यात येईल.
  3. प्रचार करताना महाविद्यालयाच्या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. कुठल्याही वर्गात अथवा महाविद्यालयात विद्यार्थी प्रचार साहित्याचे वितरण प्रदर्शन करणार नाहीत.

ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया:

करिअर संसद निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्मच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी कृपया खालील सूचना वाचून लक्षपूर्वक पालन कराव्या.

  • ई-मेल आयडीची आवश्यकता: निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियमित आणि प्रवेश प्रक्रियेत नमूद केलेल्या ई-मेल आयडीचाच वापर करावा. या ई-मेल आयडीचा वापर निवडणूक संबंधित सर्व माहिती आणि मतदान प्रक्रियेसाठी होणार आहे.
  • ई-मेल आयडी सत्यापन: विद्यार्थ्यांनी त्यांचा ई-मेल आयडी तपासून खात्री करावी की तो नियमित वापरात आहे आणि त्यावर निवडणूक संबंधित सूचना प्राप्त होऊ शकतील.
  • गुगल फॉर्मद्वारे मतदान: मतदान करण्यासाठी महाविद्यालयाच्या अधिकृत गुगल फॉर्मचा वापर करण्यात येईल.
  • मतदान: मतदानाचे दिवशी नियोजित वर्गखोलीत आपणास वेळेवर पुरविण्यात येणाऱ्या लिंकद्वारा आपल्या व्यक्तिगत नियमित आणि प्रवेश प्रक्रियेत नमूद केलेल्या ई-मेल चा वापर करून मतदान करायचे आहे.
  • विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीतच मतदान करावे लागणार आहे. त्याकरिता वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या सूचनाची नोंद घ्यावी.
  • मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांना फॉर्ममध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
  • एकदा मतदान झाल्यानंतर ते अंतिम मानले जाईल आणि कोणतेही बदल करता येणार नाहीत.
  • गोपनीयता: विद्यार्थ्यांचे मतदान गोपनीय ठेवले जाईल. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहील याची दक्षता प्रत्येक मतदाराने आणि उमेदवाराने घेणे अनिवार्य आहे.