करिअर संसद: निवडणूक प्रक्रिया


करिअर संसद निवडणूक प्रक्रिया:

 

पुढीलप्रमाणे दोन टप्प्यात सदर निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे

 

  • करिअर संसद सदस्य निवडणुक:

महाविद्यालयात सत्र २०२४ – २०२५ मध्ये पदवी  अभ्यासक्रमासाठी (बी.एस्सी, बी.सी.ए. आणि बी.व्होक) प्रवेशीत भाग १, २ आणि ३ चे प्रत्येक वर्गातील (BIO, MEB, PCM & CS) विद्यार्थी त्यांचे दोन प्रतिनिधी (एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी) करिअर संसद सदस्य पदी निवडून देतील. 

हे प्रतिनिधी करिअर कट्टाचे नोंदणीकृत विद्यार्थी असणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्गातील प्रवेशित विद्यार्थी सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून प्रतिनिधी निवडतील.

  • करिअर संसद म मंत्रिमंडळ गठन:

करिअर संसदेत वर्गांचे निवडून आलेल्या सदस्यांमधून करिअर संसदेच्या मंत्रिमंडळाचे गठन करण्यासाठी अंतर्गत निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीमधून मुख्यमंत्री पदासह विविध ८ मंत्री निवडण्यात येतील.